मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : मोपा पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन
पेडणे : पेडणे तालुका विकासाच्या बाबतीत येणाऱ्या काळात अग्रगण्य तालुका होणार असून मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ आदी प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पेडणे तालुक्याच्या विकासाबाबत दोन्ही आमदारांनी ‘भिवपाची गरज ना’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा येथील मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टवर खास पोलीस स्टेशन व नवीन वाहतूक विभाग इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना केले. नागरिकांना चांगली सेवा मिळावी, त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी सुरक्षेच्या नजरेतून गृहखाते सक्षम बनत आहे. लवकरच मांद्रे मतदारसंघात पोलीस स्टेशन उभारण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संधीचे सोने करुन घ्या
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढे सांगितले की, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे वेळोवेळी विकासाच्या बाबतीत विविध सूचना आणि मागण्या करतात. पेडणे तालुक्याची प्रगती होत आहे. मोपा विमानतळामुळे प्रगती होणारच, त्याचबरोबर लोकवस्ती देखील वाढणार आहे. त्यामुळे येथे रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहे. त्या संधीचा पेडणेकरांनी फायदा कऊन घ्यावा. बाहेरच्यांनी येऊन रोजगार, धंदा सुऊ करण्याअगोदर तुम्ही सुऊवात कऊन संधीचे सोने कऊन घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
रोजगारनिर्मितीची जनजागृती करा
पेडणेत विविध प्रकारचे प्रकल्प येत आहेत. त्यासाठी प्रशिक्षित युवा वर्गाची गरज आहे. त्यादृष्टीने येथील युवावर्गाने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रत्येक सरपंच, जिल्हा पंचायतसदस्य, कार्यकर्त्यांनी रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
पत्रादेवीत आऊट पोस्ट उभारावे
आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळासाठी भव्य पोलीस स्टेशन दिलेले आहे. हे पोलीस स्टेशन आतील भागामध्ये असल्याने नागरिकांना अडचणी येतात. म्हणून या परिसरातील नागरिकांसाठी पत्रादेवी येथे आऊट पोस्ट उपलब्ध करून द्यावे. यावेळी पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग, पोलीस अधिकारी ओमवीर सिंग, जीएमआर कंपनीचे सीईओ आर. व्ही. शेषन, उत्तर गोवा अधीक्षक निधिन वाल्सन, वाहतूक अधीक्षक बोस्युएट सिल्वा, अधीक्षक धर्मेश आंगले, पेडणे उप अधीक्षक राजेश कुमार, अधीक्षक सिद्धांत शिरोडकर, पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, मोपा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, वाहतूक पोलीस निरीक्षक महेश केरकर, पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, वाहतूक निरीक्षक विश्वजित चोडणकर, मोपा सरपंच सुबोध महाले, वारखंडचे सरपंच गौरी जोसलकर, चांदेल हसापूर सरपंच तुळसीदास गावस, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, पेडणे माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर, नगरसेविका तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, धारगळ माजी सरपंच भूषण नाईक, तोरसे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, माजी जिल्हा पंचायतसदस्य रमेश सावळ, विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, पंच स्वाती मालपेकर, कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, वझरी सरपंच अनिल शेट्यो, इब्रामपूर सरपंच अशोक धावस्कर, हळर्ण सरपंच दिव्या नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी केले.









