पेडणे अबकारी घोटाळा तपास दक्षता खात्याकडे
पणजी : पेडणे येथील अबकारी खाते कार्यालयात झालेल्या घोटाळ्dयाची चौकशी दक्षता खात्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गरज पडल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) त्याचा तपास देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात तीन जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी चालू आहे. शिवाय त्यात जर आणखी कोणी गुंतलेले असतील तर त्यांनाही निलंबित कऊन त्यांची चौकशी करण्यात येईल, असेही डॉ. सावंत म्हणाले. कोणालाही मोकळे सोडण्यात येणार नाही. दोषींवर कारवाई करणारच, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे काल मंगळवारी नव्या पोलीस स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांनी पेडणेतील अबकारी घोटाळ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.









