मुंबई
स्मॉलकॅप निर्देशांकातील जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात 15 टक्के इतकी एकंदर उसळी घेताना दिसून आला आहे. सदरचा समभाग मंगळवारी एनएसईवर 9 टक्के वाढत 141 रुपयांवर पोहचला होता. सदरच्या कंपनीला नुकतेच 2207 कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट मिळाल्याची माहिती आहे. या बातमीने कंपनीच्या समभागात उसळी दिसून आली. सदरच्या समभागाने गेल्या महिन्याभरात गुंतवणूकदारांना 45 टक्के इतका परतावा दिल्याची माहिती देण्यात आली आहे.









