जूनमध्ये व्यवहारांची संख्या 9.30 अब्ज, या महिन्याची घट अपेक्षीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जूनमध्ये यूपीआयअंतर्गत ऑनलाइन देवाणघेवाण व्यवहारांची करणाऱ्यांची संख्या 9.30 अब्ज राहिली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या संदर्भातली माहिती दिली आहे.
मेपेक्षा किंचीत कमी
मेमध्ये देखील युपीआय व्यवहार चांगले झाले होते. जून याआधीच्या म्हणजेच मे महिन्यामध्ये यूपीआय अंतर्गत 9.4 अब्ज व्यवहार झाले होते. जून महिन्यात एक दिवस कमी असल्याने व्यवहार कमी नोंदले गेले असल्याची माहिती दिली गेली आहे. यूपीआय व्यवहारातून 14.8 ट्रिलियन रक्कम व्यवहाराकरीता वापरली गेली आहे. ही रक्कम मे मध्ये 14.9 ट्रिलियन इतकी होती.
मार्चपर्यंत 84 अब्ज व्यवहार
2022-23 (एप्रिल-मार्च )मधील व्यवहार पाहता ते 84 अब्ज इतके नेंदले गेले आहेत. ज्यातून 139.1 ट्रिलियन रक्कम खर्चली गेली असल्याचेही दिसून आले आहे. यूपीआयच्या माध्यमातून दैनंदिन बिले भरण्याची सोय झाल्याने व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे, असे सांगितले जात आहे. यूपीआय लाईट, रूपे क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा सुरू केल्यानेही देवाण-घेवाणीच्या व्यवहारात वाढ झाल्याचे आणखी एक कारण पुढे येत आहे.









