Sharad Pawar News : ज्यांच्या विरोधात आमचा संघर्ष, त्यांच्यासोबतच आमचे सहकारी गेले. नव्या पिढीला नाउमेद होवू देणार नाही. नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार, महाराष्ट्राचे चित्र बदलणार. यासाठी महाराष्ट्राचा पुन्हा झंझावती दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे. कराडमधून आज नव्या मोहिमेची सुरुवात केली. नेते नसले, तरी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. सातार, कोल्हापूरने आम्हाला खूप दिलं. जाहीरपणे पक्ष बांधणीसाठी निघालोय, संभ्रम नको.70 ते 80 टक्के तरुण आमच्या पाठीशी आहेत. माझ्या स्वागतासाठी 80 टक्के तरूण होते. त्याच तरुणाईला आता आणखी बळ देण्याचा आमचा निर्णय आहे. नव्या दमाचं रक्त राज्याचं चित्र बदलून टाकेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. माझा आशीर्वाद घेऊन निर्णय घेतल्याचं सांगून संभ्रम निर्माण केला. अजित पवार कुणी परके नाहीत, मतभिन्नता असू शकते. गेलेल्या नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांची काय भावना होती हे कळलं.रामराजे निंबाळकरांच्या प्रश्नावर शरद पवारांनी सूचक विधान केलं.
जयंत पाटलांविषयी बोलताना ते म्हणाले की, जयंत पाटलांनी विचारपूर्वक पत्र लिहले. घटना पाहूनच पत्रव्यवहार केला. प्रदेशाध्यक्षांना असा पत्रव्यवहार करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही ते म्हणाले.