Sharad Pawar News : माजी केंद्रिय मंत्री, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार प्रीतीसंगमावर दाखल झाले.स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होताच पुष्पवर्षाने शरद पवारांचे स्वागत करण्यात आले. प्रीतीसंगमावर अभिवादन केल्यानंतर पवार सभा घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी पवार यांच स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आज सकाळपासूनच शरद पावर यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिक-ठिकाणी थांबले होते.दुसरीकडे शरद पवार यांचे कराडला आगमन होण्यापुर्वी कार्यकर्ते प्रीतीसंगमावर घोषणाबाजी करत दाखल झाले. अजित पवार यांच्या बंडानंतर आज पवार कराडात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता कराडसह जिल्ह्यातील कार्यकर्ते घोषणाबाजी करत प्रीतीसंगमावर दाखल झाले.’पवार साहेब तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी सातत्याने कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली होती .यामधे जेष्ठांसह युवा कार्यकर्त्यांचाही समावेश लक्षवेधी होता.








