ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी ट्विट करत जनता हे खेळ फार काळ सहन करणार नसल्याचे म्हटले आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.”
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023