डॉ. मानसिंग शिंदे यांची माहिती : गुरुतत्वाचा लाभ घेण्यासाठी सहभागाचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
येत्या सोमवारी (दि. 3 जुलै) सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यात तीन ठिकाणी गुरुपौर्णिमेचे आयोजन केले आहे. धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी दिली. निपाणी येथेही सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता या महोत्सवाला सुरूवात होणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्त राज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करा’ या विषयांवर मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. तरी या महोत्सवांत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महोत्सवांची ठिकाणे : 1) इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझारच्या माडीवर, राजारामपुरी, कोल्हापूर. 2) विनायक प्लझा, देसाई मंगल कार्यालय, गडहिंग्लज. 3) नृसिंह मंदिर, मलकापूर. तर 4) महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, महादेव गल्ली, निपाणी. वेळ : सायंकाळी 5:30 वाजता.