वारणानगर / प्रतिनिधी
पोखले (ता. पन्हाळा) येथील एकाने तळी नावाचे शेतातील आंब्याच्या झाडाला गळ्यास गळफास लावुन आत्महत्या केली. शिवाजी दिनकर जाधव (वय ४०) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतची वर्दी त्याचा चुलत भाऊ दत्तात्रय जाधव याने कोडोली पोलीस ठाण्यात दिली.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवाजी हा वारंवार तळी नावाचे शेतात जनावरांचे शेडमध्ये अधुन मधुन झोपणेकरीता जात असत. त्या प्रमाणे तो शुक्रवार दि.३० रोजी संध्याकाळी शेड मध्ये झोपणेस गेला होता आज शनिवार दि.१ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नागरिकांना शिवाजी आंब्याच्या झाडाला गळ्यास फास लावलेल्या अवस्थेत दिसला असता त्याला खाली उतरून तातडीने उपचारास कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारपूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगितले









