कोल्हापूर,प्रतिनिधी :
राजारामपुरी दुसरी गल्ली येथील मोरया रेसिडेन्सी अपार्टमेंट येथे सौ शेफाली कार्तिक मेहता यांनी झुंबा डान्स चालवणे,दुसऱ्यांच्या पार्किंगमध्ये चार चाकी लावणे, दोन टेरेसचा ताबा स्वतःकडे ठेवणे,फायर एक्झिट मध्ये चौथ्या मजल्यावर दरवाजा लावणे,महिला असल्याचा गैरफायदा घेऊन पोलीस स्टेशन,ग्राहक न्यायालय,दिवाणी न्यायालय ,महिला दक्षता समिती त्याठिकाणी खोट्या तक्रारी व गुन्हे दाखल करणे अपार्टमेंटमधील लोकांना प्रचंड शिवीगाळ करणे,धक्काबुक्की करणे,भीतीचे वातावरण तयार करणे,आदी प्रकार सौ शेफाली कार्तिक मेहता यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून केले जात आहेत तरी हे प्रकार त्यांनी थांबवावे आणि अपार्टमेंटमधील सर्व नागरिकांना सुरळीतपणे जीवन जगू द्यावे अशी मागणी अपार्टमेंटमधील नागरिक रहिवासी संजय पवार,शैलेश मोरे,किरण पाटील,प्रकाश शिंदे,तुषार बेर्डे,विद्या पवार,स्नेहल मोरे,चंद्रभागा पाटील आदींनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
आम्ही सर्व रहिवाशी या अपार्टमेंटमध्ये राहत असून सौ.शेफाली मेहता व त्यांचे कुटुंबीय अपार्टमेंटमध्ये पाचव्या व सहाव्या मजल्यावर राहतात त्यांनी अपार्टमेंटमधील रहिवाशांची नोंदणीकृत असोसिएशन करण्यास वारंवार विरोध केला आहे.त्याप्रमाणे २०२० नंतर कोणत्याही प्रकारचा सामायिक मेंटेनन्सची रक्कम न देता सामायिक सुविधा यांचा वापर केला आहे. शिवाय या ठिकाणी झुम्बा डान्स क्लास चालविण्यास मनाई करण्यात आली असतानाही तो त्या चालवीत आहेत.अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांच्याकडून नेहमी शिवीगाळ करणे,महिलांना बोलणे असे प्रकार करत असतात शिवाय शेफालीच फिटनेस स्टुडिओ अँड डान्स अकॅडमी या नावाने त्यांनी झुंबा डान्स क्लास या ठिकाणी सुरू केला आहे याचा सर्व रहिवाशांना तसेच परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
शिवाय त्या मुद्दाम जाणीवपूर्वक इतर फ्लॅटधारकांच्या गॅलरीमध्ये तुळशी कट्ट्यावर जिन्यावर पार्किंग मध्ये कचरा टाकत असतात.दुपारच्या वेळी कॉमन जागेमधील लाईट लावत असतात.आम्हा सर्व रहिवाशांना नाहक त्रास मेहता कुटुंबीयांच्याकडून केला जात आहे.तरी त्यांनी आम्हाला त्रास देणे थांबवावे अशी मागणी या सर्व मोरया अपार्टमेंटमधील रहिवाशांनी केली आहे.
दैनंदिन जीवन व मानसिक स्वास्थ्य बिघडवणे तसेच आमचे खच्चीकरण करण्यासाठी वारंवार महिला असलेली सहानुभूती मिळण्याकरिता तसेच सुशिक्षित पणाचा खोटा अट्टाहास वारंवार शेफाली मेहता यांच्याकडून केला जातो आहे.नवनवीन वकीलामार्फत तसेच निम शासकीय समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून त्यांना अपूर्ण प्रामाणिकपणाची लबाड प्रवृत्तीची व खोटी माहिती देऊन दिशाभूल करून आम्हास नोटिसा पाठवत आहेत.त्या जुन्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या त्यावेळी त्यांनी तेथील नागरिकांनाही अशाच पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यावेळी शेफाली मेहता यांनी जुन्या अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या विरोधातही तक्रारी दाखल केल्या होत्या.महिला असलेला गैरफायदा घेऊन आम्हा सर्वांना तसेच पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणालाही वेठीस धरण्याचे प्रकार या मेहता कुटुंबीयांकडून आजतागायत होत आलेले आहेत हे त्यांनी थांबवावे अशी मोरया अपार्टमेंटमधील रहिवाशांनी मागणी केलेली आहे.









