घुणकी प्रतिनिधी
कृषी दिनाचे औचित्य साधून गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार हा इतर शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व अद्यावत पीक पद्धत शेतीसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन डॉ जयवंत जगताप यांनी केले. किणी (ता हातकलंगले ) येथे आम्ही किणीकर या सामाजिक संघटनेकडून कृषी दिन व डॉक्टर डे अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते . किणी येथील शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत लक्षणीय प्रगती केली आहे त्याचे आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेऊन प्रगती साधावी असेआवाहन डी वाय पाटील कृषी विज्ञान संशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयवंत जगताप यांनी केले . तर वारणा दूध संघ संचालक अॅड. एन आर पाटील यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांचे कौतुक करुन आम्ही किणीकर संघटनेने चांगला ऊपक्रम राबवला असलेच गौरव उद्गा गार व्यक्त केले . यावेळी प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब पाटील गणपतराव खोपकर सुमित दनाने अमर पाटील बजरंग पवार निखिल चाळके अनुसया यशवंत माळी यांचा शेतीत वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर डॉक्टर डेनिमित्त डॉ ए पी पाटील डॉ मिलिंद कुंभार डॉ स्मिता माळी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक घाटगे वारणा साखरचे संचालक विजय धनवडे हंबीरराव पाटील अजित पाटील वैभव कुंभार ग्रामपंचायत सदस्य रणजीत निकम संताजी माने सचिन पाटील प्रवीण खोपकर नरेंद्र घाटगे शांतीकुमार पाटील व कृषी सहाय्यक मोहिते यांच्यासह विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन नंदकुमार माने यांनी केले तर आभार अजित पाटील यांनी मानले.