Kolhapur News : राजारामपुरीत सोसायटीच्या पार्किंगमध्ये एकमेकांना बघण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेत महिलेसह त्यांच्या दोन्ही मुलांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली.शेफाली मेहता,केनील मेहता, तनिष मेहता अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावून मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरीत सोसायटीच्या पार्किंगमध्ये आज सकाळी हाणामारी झाली. मारहाण प्रकरणी संजय पोवार त्यांची पत्नी विद्या पोवार आणि मुलगा अर्जुन पोवार यांच्यासह 5 ते 6 जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पोवार हा माजी खासदारांचा कार्यकर्ता असल्याचा दावा मारहाण झालेल्या महिलेने केला आहे. संजय पोवार यांच्याकडून जीवितास धोका असल्याने तत्काळ कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे.
कोल्हापुरातल्या राजारामपुरी येथील दुसऱ्या गल्लीत मोरया रेसिडेन्सी इथं मेहता कुटुंबियांकडून नाहक त्रास होत असल्याची तक्रार अपारमेंट मधील नागरिकांनी केली आहे.या नागरिकांनी कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातला खुलासा केला आहे.या अपार्टमेंटमधील शेफाली मेहता या महिला असल्याचा गैरफायदा घेऊन तक्रारी आणि खोटे गुन्हे दाखल करून भीतीच वातावरण तयार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. याबाबत संबंधितांच्या विरोधात न्याय मिळावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.