जुम्मा मशीद कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : दोडवाड तसेच परिसरात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्यासाठी दोडवाड येथे दोन एकर ईदगाह मैदान राखीव ठेवली आहे. मात्र सर्व्हे करून चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली आहे. तेव्हा तातडीने त्यामध्ये बदल करून योग्य नियमानुसार त्याची नोंद करावी, अशी मागणी दोडवाड येथील जुम्मा मशीद कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दोडवाड गावातील सर्व्हे क्रमांक 379 मध्ये दोन एकर जमीन ईदगाहसाठी देण्यात आली आहे. मात्र ती जमीन सर्व्हे करून नोंद करताना 9 कॉलम ऐवजी 11 कॉलममध्ये नमूद केली आहे. त्यामुळे भविष्यात समस्यानिर्माण होणार आहे. तेव्हा तहसीलदारांना सूचना करून संबंधित जाग्याची नोंद 9 कॉलममध्येच करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. तहसीलदार शुभानंद खाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वासीम नदाफ, मक्तुम नदाफ, मेहबूबसाब हुच्चेनकट्टी, बाबाजान नदाफ यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.









