न्हावेली/ वार्ताहर
जूनच्या तोंडावर बिपरजॅाय वादळामुळे पाऊस लांबला होता त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांसह अनेकांना सहन करावा लागला होता. पावसाने उसंत दिल्यामुळे शेतीची कामे अर्धवट झाली होती . आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा मोठ्या चितेंत होता . दरम्यान जिल्ह्यात पाऊस दाखल झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजासह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे .
बऱ्याच विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रीय झाला. पावसाच्या आगमनाने शेतीकामांना वेग येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काही दिवस दडी मारली. अखेर आता पावसाने दमदार हजेरी लावली. बऱ्याच दिवसांपासून लांबलेला मान्सून सक्रीय झाल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. रखडलेल्या शेतीच्या कामांना गती येणार आहे. सावंतवाडी तालुक्यात पावसाने लॉन्ग ब्रेकनंतर दमदार हजेरी लावली. गेले कित्येक दिवस गर्मीने त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत पडलेला बळीराजा देखील सुखावला आहे. पाऊस न पडल्याने यावर्षी शेतीलादेखील उशीर झाला होता. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती मात्र , बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे .
Previous Articleदेशात जून महिन्यात उणे 10 टक्के पाऊस
Next Article दोडवाडातील ईदगाह जमिनीची नोंद योग्य पद्धतीने करा









