अवघड वळणे पूर्ण करुन गाठले शिखर
बेळगाव : मनाली – खारदुंगला पास हे जगातील सर्वात उंचीवरील मोटरेबल रोड बेळगावच्या 14 सायकलपटूंनी सायकल चालवून सर करुन उंच भरारी मारली आहे. मनाली येथील खारदुंगला पास हे अत्यंत अवघड असा कठीण वळणाचा रस्ता आहे आणि जेथे तापमान नेहमीच अनिश्चित असते. अशा ठिकाणी सायकलपटूंनी एकूण 10 दिवस प्रवास करुन 600 कि.मी. अंतर पार करुन गिर्यारोहण केले. या सायकलपटूंनी समुद्रसपाटीपासून अंदाजे 4 हजार मीटर उंचीपर्यंत सायकल चालविली आहे. मनाली, मारही, केलाँग, झेडझेड बार, सरचू, पांग, डेब्रींग, रमस्टे, लेह आणि नवव्या दिवशी सायकलपटू खारदुंगलाला पोहोचले. हे सर्व सायकलपटू वेणुग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य असून यामध्ये अतुल हेरेकर, महेश चौगुले, अनिल गोडसे, भाऊ नेसरकर, बाळकृष्ण गोडसे, धीरज भाटे, सचिन अष्टेकर, राहुल ओऊळकर, विक्रांत कलखांबकर, राजू नायक, अजित शेरिगार, महेश जुवळी, जसमिंदर खुराना व प्रसाद चंदगडकर यांचा सहभाग होता. या सायकलपटूंमध्ये 55 वर्षीय ज्येष्ठ राजू नायक तर 32 वर्षांचे तरुण भाऊ सरकार यांचा सहभाग होता.









