रत्नागिरी / प्रतिनिधी :
शहरातील मारूती मंदीर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे न दिल्याच्या रागातून तरूणावर ब्लेड व कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. ज्ञानेश्वर बाबुराव लव्हारे (26, रा. पुणे उत्तमनगर) असे जखमी तरूणाचे नाव आह़े. यापकरणी शहर पोलिसांनी तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा आहे.
शरद तातोबा नार्वेकर, अन्वर अली गोलंदाज व सुनील वसंतराव जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लव्हारे हे बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मारूती मंदीर परिसरातील हॉटेल शुभम येथे जेवण पार्सल नेण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी यांनी त्यांना जवेणाचे 6 हजार रूपये बील पे करण्यास सांगितल़े. याला लव्हारे यांनी नकार दिल़ा.
लव्हारे यांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केल़ी. यातून लव्हारे व आरोपी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्याच्यात हाणामारी झाल़ी. यावेळी आरोपीत यांनी लाथा-बुक्क्यांनी लव्हारे यांना मारहाण केल़ी. तसेच आरोपी यांनी आपल्याजवळील धारधार ब्लेड व कायत्याने लव्हारे यांच्यावर सपासप वार केल़े. लव्हारे यांच्यावर वार होताच रक्ताच्या चिळकांड्या आरोपीत यांच्या अंगावर उडाल्य़ा.
या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लव्हारे यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आल़े. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े. लव्हारे यांनी दाखल केलेल्या तकारीनुसार पोलिसांनी 3 संशयितांविरूद्ध भादंवि कलम 324,323,504 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा. यापकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.









