आंतरराष्ट्रीय अध्ययनातून समोर आले भीतीदायक वास्तव
वाढत्या तापमानासोबत घरगुती हिंसा देखील वाढत आहे. भारत आणि नजीकच्या देशांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे घरगुती तसेच लैंगिक हिंसेच्या घटना वेगाने वाढल्या आहेत. म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव आता वैयक्तिक संबंधांवरही पडू लागला आहे. महिलांच्या विरोधात इंटिमेट पार्टनर वायोलेन्समध्ये s(आयपीव्ही) वाढ होत आहे.
भारत, पाकिस्तान आणि नेपाळच्या 15-49 वयोगटातील 1.94 लाखाहून अधिक महिलांनी आपल्यासोबत भावनात्मक, शारीरिक अणि लैंगिक हिंसेच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार केली आहे. हा डाटा ऑक्टोबर 2010 पासून 2018 दरम्यानचा आहे. हे अध्ययन अलिकडेच जामा सायकियॅट्रीमध्ये प्रकाशित झाले आहे. हे अध्ययन चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडच्या वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय समुहाने केले आहे. महामारी विज्ञान आणि अधिक तापमानाच्या हिशेबाने डाटा पाहिला असता वाढत्या तापमानानासोबत आयपीव्हीच्या घटना वाढल्याचे वैज्ञानिकांना आढळून आल्याचे अध्ययन अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

पारा वाढल्यास हिंसेत भर पडणार
वार्शाक तापमान जेव्हा 1 अंशाने वाढते, तेव्हा आयपीव्हीचे प्रमाण 4.9 टक्क्यांनी वाढते, तेव्हा सर्वाधिक शारीरिक हिंसा नोंदली गेली आहे. शारीरिक हिंसा 23 टक्के, भावनात्मक हिंसा 12.5 टक्के आणि लैंगिक हिंसा 9.5 टक्के असे प्रमाण राहिले आहे. चालू शतकाच्या अखेरपर्यंत आयपीव्ही 21 टक्क्यांनी वाढणार आहे. तापमानवाढ थांबण्याची कुठलीच चिन्हे नाहीत. जागतिक तापमानवाढ रोखण्यात न आल्यास महिलांसोबतच्या हिंसेच्या घटना वाढत जाण्याची स्थिती ओढवणार आहे. शतकाच्या अखेरपर्यंत शारीरिक हिंसेच्या घटटना 28.3 टक्के, लेंगिक हिंसेच्या घटना 26.1 टक्के आणि भावनात्मक हिंसेच्या घटना 8.9 टक्के होऊ शकतात.
भारतात आयपीव्ही अधिक
भारतात आयपीव्हीची पातळी 2090 पर्यंत वाढून 23.5 टक्के होईल. यानंतर 14.8 टक्के दरासह नेपाळ दुसऱ्या स्थानावर राहिल. तर 5.9 टक्के आयपीव्हीसोबत पाकिस्तान सर्वात कमी आयपीव्हीचा देश ठरणार आहे. या अध्ययनाचे विश्लेषणक 2 जानेवारी 2022 पासून 11 जुलै 2022 पर्यंत करण्यात आले आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक प्रभाव भारत, चीन, अमेरिका आणि युरोपमध्ये दिसून आला आहे. या देशांच्या अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटा दिसून आल्या आहेत. आयपीव्ह 4.9 टक्क्यांनी वाढण्याचा अर्थ घरगुती हिंसेच्या घटनांमध्ये 6.3 टक्के वाढ होणे आहे.

वाढत्या उष्णतेमुळे वाढतो तणाव
अधिक तापमानामुळे पिकाची हानी होते. पायाभूत विकास रखडतो, आर्थिक व्यवस्था कमकुवत होऊ लागतात, लोक घरांमध्ये कैद होता. योग्यप्रकारे त्यांना स्वत:चे काम करता येत नाही. यामुळे कुठल्याही कुटुंबावर मोठे दडपण येऊ शकते. यातून तणाव वाढून घरगुती हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका असतो. घरगुती हिंसेच्या घटना सर्वाधिक कमी उत्पन्नगटातील कुटुंब आणि ग्रामीण भागांमध्ये वाढल्या आहेत. यापूर्वी अशाचप्रकारे अध्ययन माद्रिदमधील वैज्ञानिकांनी केले होते. त्यांनी केनियातील महिलांवर अध्ययन केले होत. तेव्हा तेथे तापमान वाढल्यामुळे आयपीव्ही 40 टक्क्यांनी वाढला होता.









