नवी दिल्ली
शहरासह ग्रामीण भागात पोहोचलेल्या स्मार्टफोनमुळे ऑनलाईन खरेदी वाढताना दिसत आहे. महानगरे सोडता छोट्या शहरांमध्येही ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढलेली पाहायला मिळते आहे. आपल्या उत्पन्नापैकी 16 टक्के खर्च भारतीय ऑनलाईन शॉपिंगवर करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सायबर मीडिया रिसर्च यांच्या पाहणीमध्ये ही बाब समोर आली आहे. टायर 2 शहरे आणि इतर शहरांमध्ये भारतीय एका आठवड्यात सरासरी 2 तास 25 मिनिटे ऑनलाईन शॉपिंगकरिता वेळ देतात, असे दिसून आले आहे.









