आगामी 10 वर्षांसाठीची योजना तयार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अदानी समूहाची कंपनी अदानी टोटल गॅस (एटीजीएल) आणि फ्रेंच ऊर्जा क्षेत्रातील टोटल एनर्जीस गॅस वितरकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील 8-10 वर्षांत 18,000-20,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे अशी माहिती कंपनीचे सीएफओ पराग पारीख यांनी दिली.
अदानी टोटल गॅसच्या आर्थिक वर्ष 23 च्या वार्षिक अहवालात कंपनीने म्हटले आहे की गुंतवणुकीचा वापर पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि आणखी सीएनजी स्टेशन जोडण्यासाठी करणार आहे. कंपनीकडे सध्या 460 सीएनजी स्टेशन्स आणि पाईपयुक्त स्वयंपाक गॅसचे 7 लाख घरगुती ग्राहक आहेत.
कंपनीचे सीएफओ पारिख म्हणाले की, अदानी टोटल भारतभर 3,000 पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग पॉइंट्स तयार करण्याची योजना आखत आहे. तसेच आम्ही उत्तर प्रदेशातील बरसाना येथे 600 टीपीडीच्या प्रारंभिक क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या बायोगॅस संयंत्रांपैकी एक सुरू करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.









