प्रतिनिधी / बेळगाव
केवळ पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री मारुतीनगर येथे उघडकीस आली आहे. यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
गायत्री भरत गिंडे (वय 26 रा. तिसरा क्रॉस, मारुतीनगर) असे त्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. 24 जून रोजी तिचे लग्न झाले होते. गायत्रीचे कुटुंबीय मूळचे अलतगा येथील असून सध्या मुंबईत राहतात. लग्नानिमित्त सर्वजण बेळगावला आले होते. क्षुल्लक कारणानंतर झालेल्या मनस्तापातून या नवविवाहितेने आपले जीवन संपविले आहे. लग्नानंतर केवळ पाच दिवसांत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









