शाहुवाडी प्रतिनिधी
Kolhapur : मलकापूर येथील पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पूजा अभिषेक घालण्यात आला.मंत्रो उपचाराचा जयघोष विठू नामाचा गजर करत.भक्तगणांच्या असंख्य गर्दीत आषाढी एकादशी साजरी झाली. विठ्ठल भक्त मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्तेअभिषेक घालण्यात आला.बिंदू चौक कोल्हापूर येथील व्हटकर महाराज यांच्या वतीने विट्ठल रुक्मिणी मूर्तीस चांदीचा किरीट अर्पण करण्यात आला.
मलकापूर शहरात असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. आकर्षक काढलेली रांगोळी, सुनील माळी यांनी केलेले फुलांची सजावट आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात मंदिर परिसरात मंदिर समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह गणेश गांधी,आनंदा भिंगार्डे ,दस्तगीर अत्तार ,संपत पाटील आदींच्यासह असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
मंदिरात मलकापूरसह पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजनाचे आयोजन करण्यात आलं होतं. तर सायंकाळी साडेसात वाजता महाआरथी करण्यात येणार आहे. अनेक नागरिकांनी येणाऱ्या भक्तगणासाठी फराळ दिला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती .









