मालवण : प्रतिनिधी
शहरातील दांडी येथील श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिरात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. भर पावसात निघालेल्या दिंडीत मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. टाळ, मृदुंगाचा गजर अन् विठुरायाच्या नामघोषाने दांडी समुद्रकिनारा दुमदुमून गेला होता. श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिर, मोरयाचा धोंडा देवस्थान, श्री देव दांडेश्वर ते पुन्हा श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिर या मार्गे पारंपरिक दिंडी उत्सव चालतो.









