मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिकेने नरगुंदकर भावे चौक येथील मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गो-शाळेत केली आहे. यापूर्वीसुद्धा पकडलेल्या जनावरांना के. के. कोप्प येथील गो-शाळेत दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रसारमाध्यमांमधून मोकाट जनावरांच्या समस्येचा प्रश्न मांडला गेल्यानंतरच महानगरपालिका कारवाई का करते, असा प्रश्न नागरिक करत आहेत. सध्या संपूर्ण शहरामध्ये ‘जनावरे बसथांब्यांमध्ये आणि प्रवासी रस्त्यावर’ असे चित्र पहायला मिळते. शहरातील बहुसंख्य बसथांबे म्हणजे मोकाट जनावरांचे आश्रयस्थान झाले आहेत. हे चित्र दररोजच पहायला मिळते. त्यामुळे महानगरपालिकेच्या पथकाने मोकाट जनावरांना हटविण्याच्या मोहिमेमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
अशीच कारवाई दररोज करा
बुधवारी नरगुंदकर भावे चौकातील जनावरांना पकडून त्यांना श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये धाडण्यात आले. अशीच कारवाई दररोज करावी आणि मोकाट जनावरांबरोबर मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









