मुंबई
मुंबईतील आयटी सोल्युशन उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी राशी पेरीफेरल्स यांचा लवकरच आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 750 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती मिळते आहे. शेअर बाजारातील नियामक सेबीकडे कंपनीने आयपीओ सादरीकरणाकरिता आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे जमा केली आहेत. याला सेबीने मंजुरी दिली असल्याचेही सांगितले जात आहे. उभारलेल्या रकमेचा वापर कंपनी कर्ज भरण्यासाठी करणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या विस्तारासाठी देखील या रकमेचा वापर केला जाणार आहे. आयपीओसंबंधी कंपनी विविध बँकांशी चर्चा करते आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 9313 कोटी ऊपयांचा महसूल प्राप्त केला आहे. जो आर्थिक वर्ष 2021 पेक्षा 57 टक्के अधिक आहे.









