आचरा हद्दीतील पोलीस पाटीलांची बेळणेत बैठक
आचरा प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी चंदगड जि. कोल्हापूर येथील पोवाची वाडी मधील पोलीस पाटलाचा झालेल्या खून प्रकरणाच्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी बेळणे चेक पोस्ट आचरा येथे आचरा पोलिस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील यांची संयुक्तिकरित्या बैठक आयोजित करून त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर काय उपाययोजना काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला . यावेळी पोलीस पाटील हे शासन व पोलीस खात्याचा शेवटच्या टप्प्यातील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठीचा एक महत्त्वाचा दुवा असल्याचे ते म्हणाले.
यावेळी हिवाळे गावचे पोलीस पाटील श्री. विरेंद्र कदम हे कायमस्वरूपी सतर्क राहून पोलीस ठाणेस त्वरित माहिती देत असल्याकारणाने गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न झाल्याने त्यांचा आचरा पोलीस ठाणे मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी आचरा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते तसेच पोलीस ठाणे मार्फत पोलीस अंमलदार अक्षय धेंडे व अनिकेत सावंत ही उपस्थित होते.पोलीस पाटील यांना आचरा पोलीस ठाणे येथे येण्याकरिता होणारा गाडी खर्च लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी व्हटकर यांनी बेळणे आऊट पोस्ट मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी मीटिंग घेण्याबाबत येईल असे सांगितले तसेच पोलीस ठाण्यातील नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गाव भेटी दरम्यान पोलीस पाटील यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल ग्रामस्थांसमोर सत्कार करून त्यांचा मानसन्मान वाढवण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.