सावंतवाडी प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्त्या व योजना पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी’योजनांचा जागर’हा उपक्रम राबविला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी मा. डॉ. महेश पालकर,- शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. प्रजित नायर- मुख्यकार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या प्रेरणेने शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा ओरोस पतपेढी येथे संपन्न झाली. या कार्यशाळेस १९२ मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेस माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (योजना) मा. श्री. प्रदिपकुमार कुडाळकर , विस्तार अधिकारी श्रीम. आवटी मॅडम, श्रीम. सुषमा खराडे मॅडम, श्रीम स्मिता नलावडे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. मुश्ताक शेख यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणारी खुली शिष्यवृत्ती, आर्थिक मागास गटातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची गुणवत्ता शिष्यवृत्ती, माजी सैनिक मुलांना शिष्यवृत्ती, स्वातंत्र्य सैनिक मुलांना शिष्यवृत्ती या बाबत माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. तसेच संच मान्यता, समायोजन, विद्यार्थी प्रवेश, शिक्षक-शिक्षकेतर भरती याबाबत माहिती दिली.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg