न्हावेली / वार्ताहर
सध्या विजेचा खेळ खंडोबा पाहिला तर महावितरणचा कारभार हा रामभरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.मळेवाड मूरकरवाडी येथे 15 दिवसापूर्वी वीजपुरवठा करणारा पोल वाकला होता. यासंदर्भात ग्राहकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना याची कल्पना दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरमार्फत सदरचा पोल हा पुन्हा उभा करण्यात आला.मात्र दोन दिवसांपूर्वीच सदरचा पोल पुन्हा एकदा वाकल्याने महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने काळजीपूर्वक काम करतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी उभारलेला हा पोल वाकला असून तो त्याच परिस्थितीत गेले दोन दिवस आहे.याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही अद्याप पर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही.हा हलगर्जीपणा एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो.पंधरा दिवसांपूर्वी पुरलेला पूल अशा पद्धतीने वाकत असेल तर कॉन्ट्रॅक्टर तुपाशी आणि ग्राहक उपाशी असंच म्हणावं लागेल.उद्यापर्यंत जर ह्या पोलची दुरुस्ती न झाल्यास ग्राहक व ग्रामस्थ अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.तसेच मळेवाड- कोंडुरे परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर वेळीच तोडगा काढावाअन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थ व ग्राहक यांनी दिला आहे.









