मोती तलावाची कोसळलेली भिंत लाखो रुपये खर्च करून पुन्हा बांधण्यात आली. रिटर्निंग वॉल ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी पावसाच्या दोन दिवसाच्या पाण्यातच बऱ्यापैकी भिंत खचून तळ्याचा कठडा बऱ्याच प्रमाणात खचला असून मोठ्या पावसाच्या पाण्यात तो पुन्हा कोसळण्याची शक्यता असल्याने त्वरित याकडे नगरपालिका व बांधकाम विभागाने लक्ष घालून खचलेल्या ठिकाणी भर घालून घ्यावा अशी मागणी काल सावंतवाडी राष्ट्रवादीने केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली आहे . राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर तळ्याच्या काठाचा खचलेला भाग आज सकाळपासून भरण्याचे काम सुरू झाले आहे. त्या ठिकाणी दोन दिवसात भर न टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला होता सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, व अन्य पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधले होते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









