न्हावेली/ वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या दुचाकीवर आज सकाळी घणस जातीचा साप आढळून आला. गावडे नेहमीप्रमाणे दुचाकीजवळ आले असता अचानक घणस निदर्शनास आला. सावधगिरी बाळगता त्यांनी आपला जीव वाचवला त्यानंतर त्याला वेत्ये येथील सर्पमित्र यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले .याबाबत अधिक माहिती अशी की, सरपंच गुणाजी गावडे हे आज सकाळी आपल्या दुचाकी घेऊन कामानिमित्त बाहेर पडत असताना त्यांना दुचाकी पाशी घणस असल्याचे समजले. त्यांनी सदर खबर तात्काळ गावातील आपल्या सर्पमित्रांना दिली. मोठ्या शिताफीने घणस सापाला पकडून जंगलमय भागातील नैसर्गिक अधिवासात सोडले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









