गोकुळ शिरगाव वार्ताहर
उचगाव (ता. करवीर) येथील स्वप्नील सुभाष यादव (वय -२८) या बेपत्ता युवकांचा मृतदेह तामगावं येथील गुरुजी देवस्थान जवळ असलेल्या ओढ्यात सोमवारी सकाळी आढळून आला. याबाबत तामगाव पोलीस पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर त्याचा मृतदेह पोलीसांनी ओढ्याच्या पात्राबाहेर काढला.
उचगाव मधील हा युवक बेपत्ता असल्या बाबत त्यांच्या नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत कळविले होते. सदर युवकांच्या मृत्यू बाबत तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सनदी व पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत.









