Sangola Accident News : ट्रॉलीतून पडून वारकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि- २६) जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सांगोला मिरज रोडवरील उदनवाडी जवळील सर्विस रोडवर घडली आहे. कमल तुकाराम धनगर (वय- 60) राहणार आरसुले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असे वारकरी महिलेचे नाव आहे.
आरसूले तालुका पन्हाळा येथील वारकऱ्यांची पायी दिंडी मजल दरमजल करत मिरज सांगोला रोडवरून पंढरपूरकडे मार्गस्थ निघाली होती. रविवार रात्री या दिंडीचा मुक्काम पाचेगाव फाटा ता.सांगोला येथे होता. सोमवार विश्रांतीनंतर वारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिंडी उदनवाडी ता.सांगोला नजीकच्या ब्रिज जवळील सर्व्हिस जवळआली असता ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पाठीमागे बसलेल्या कमल धनगर यांचा पाण्याने चूळ भरताना तोल गेला. यामध्ये कमल धनगर या ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या जोड वरील लोखंडी जोडणीवर पडल्या व ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. धनगर यांना गंभीर जखमी अवस्थेत सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कमल धनगर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत संजय सरगर यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.









