वाकरे,प्रतिनिधी
कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक,सहकार,कला,क्रिडा,शैक्षणिक,कृषी औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात उत्तुंग कार्य केले, त्याचबरोबर राधानगरी धरणाची उभारणी करून जिल्ह्यात हरितक्रांती केली असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कुडित्रे (ता. करवीर ) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १४९ व्या जयंती कार्यक्रमात चेअरमन नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन विश्वास पाटील होते. स्वागत कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व संचालक,अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.









