बेळगाव शहराच्या उत्तर मतदारसंघ मुजावर गल्लीत बोअरवेल खोदण्याच्या कामाला आमदार आसिफ सेठ यांनी चालना दिली.
यंदा पाऊस उशिरा आल्याने शहरामध्ये पाणीटंचाई त्रासली आहे. अशा वेळेत बोअरवेल खोदाईच्या कामाने येथील
नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार आसिफ सेठनिवडून आल्यापासून जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. याप्रसंगी त्यांनी परिसरातील नागरिकांनी बोअरवेलचा स्मार्ट वापर करून पाण्याचा विनाकारण अपव्यय करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी मुजावर गल्लीचे प्रमुख व नागरिक सहभागी झाले होते.









