Gadhinglaj Suicide Case : उद्योजक संतोष शिंदे यांच्यासह पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन या तिहेरी आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेविका, आणि सहाय्यक पोलीस अधिकारी राहुल राऊत या संशयिताना पकडण्यात यश आले होते. त्यांना सोमवारी सकाळी गडहिंग्लज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्रथम वर्ग सुजित राठोड यांनी संशयित दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशित आरोपी नाकडी सोनाली असून सरकारी ॲड. नीता चव्हाण यांनी काम पाहिले.
गडहिंग्लज उद्योजक संतोष शिंदे यांच्यासह पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन या तीहेरी आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेविका शुभदा पाटील (रा. गडहिंग्लज) पोलीस अधिकारी राहुल राऊत (रा. नीलजी) विशाल बाणेकर, संकेत पाटे (दोहेही रा. पुणे) या चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शुभदा पाटील आणि निलंबित पोलीस अधिकारी राहुल राऊत यांना काल सोलापुरात अटक केली. आज त्यांना न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. यातील संशयित माजी नगरसेविका शुभदा पाटील, राहुल राऊत यांना गडहिंग्लज न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त आणि नागरिकांचा रोष
आत्महत्या प्रकार घडल्यानंतर माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी यांच्या बद्दल गडहिंग्लजकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. गडहिंग्लज नेहमीच शांतता प्रिय शहर म्हणून ओळखलं जाते. घडलेला प्रकार हा संताप आणणारा असून याबद्दल तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे. आत्महत्याग्रस्त संतोष शिंदे हे युवा उद्योजक असल्याने शहराशी त्यांची नाळ जोडली होती. संशयतांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद शहरात उमटले. आरोपींचे वकीलपत्र कोणी घेऊ नये अशी मागणी शहरवासी यांनी केली. नागरिकांचा संताप पाहता त्यांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.








