आरबीआय गव्हर्नरांची माहिती
वृत्तसंस्था /मुंबई
एकूण 3.62 लाख कोटी ऊपयांपैकी 2.41 लाख कोटी ऊपये म्हणजेच जवळपास दोन तृतीयांश पेक्षा जास्त मूल्याच्या 2,000 ऊपयांच्या नोटा गेल्या महिन्याभराच्या काळात बँकांमध्ये जमा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. तसेच2000 ऊपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. 19 मे रोजी मध्यवर्ती बँकेने अचानक 2000 ऊपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची सूचना जारी केली होती. आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रानुसार देशवासीय 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जाऊन 2,000 ऊपयांच्या नोटा बदलू शकतात किंवा जमा करू शकतात. आतापर्यंत जमा झालेल्या 2000 च्या मूल्यापैकी सुमारे 85 टक्के नोटा बँक खात्यांमध्ये जमा स्वरूपात आल्या आहेत. म्हणजेच लोक 2000 च्या नोटा बदलण्याऐवजी आपल्या बँकखात्यात जमा करण्यालाच प्राधान्य देताना दिसत असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. यापूर्वी 8 जून रोजी पतधोरण आढाव्यानंतर दास यांनी 1.8 लाख कोटींच्या 2,000 ऊपयांच्या नोटा परत आल्याचे म्हटले होते. चलनात असलेल्या एकूण 2,000 ऊपयांच्या नोटांपैकी हे प्रमाण सुमारे 50 टक्के होते. 2,000 ऊपयांच्या नोटा चलनातून काढल्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबत विचारले असता त्यांनी कोणताही विपरीत परिणाम जाणवणार नसल्याचेही सांगितले.









