नदी पुर्णक्षमतेने वाहू लागली. दोन दिवसांच्या पावसानंतर वाळवंटी नदीला पाणी
डिचोली. प्रतिनिधी
मे महिन संपूनही जून महिना संपायला आला तरीही पावसाची वृष्टी नसल्याने कोरडी पडत चाललेल्या वाळवंटी नदीचा प्रवाह पुन्हा बहरला आहे. त्यामुळे आता या नदीतील पाण्याच्या कमतरतेमुळे असलेले सर्व धोके टळले आहेत. काल शनि. दि. 24 जून रोजी नदी पुर्णक्षमतेने वाहू लागली होती. या नदीला विर्डी गावातून येणारा पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.
पाऊस नसल्याने वाळवंटी नदीला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वत्र नदी ओसाड दिसू लागली होती. अंजुणे धरणातील पाण्यानेही तळ गाठल्याने या नदीत सोडण्यात येण्राया पाण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. त्यामुळे या नदीचीही पातळी घटली होती. नदीत विविध ठिकाणी डबकी तयार झाली होती. अंजुणे धरणातून सोडण्यात येण्राया पाण्याचा साठा समाधानकारक झाल्यानंतर नदीतून पाणी पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाला खेचले जात होते. या नदीची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.
गुरूवारी अंजुणे धरण परिसर, विर्डी महाराष्ट्र या भागात पावसाने दमदार बरसात केली. तसेच शुक्रवारी सकाळपासून गोव्यातही विविध ठिकाणी बराच पाऊस झाला. केरी सत्तरी व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वाळवंटी नदीला जुळण्राया सर्व उपनद्या, नाले प्रवाहीत झाले. त्यामुळे वाळवंटी नदीला काल शनिवारी सकाळीच बरेच पाणी आले होते. कोरडी पडल्याने नदीतील माती, खडके स्पष्टपणे दिसत होती. काल आलेल्या पाण्यामुळे नदीतील माती खडके अदृष्य झाली होती.









