पावसाविना घटप्रभानदी कोरडी पडली आहे त्यामुळे नदीतील लाखों माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोकाक तालुक्यातील नल्लानट्टी येथे घडली आहे.
जून महिना संपत आला तरी पाऊसाचे लक्षण दिसत नाही त्यामुळे नदी-नाले कोरडे पडले आहेत. घटप्रभा नदी कोरडी पडली असून लाखोंच्या संख्येने मासे आपला जीव सोडत आहेत. बळोबाळ, बिरनगट्टी गावात देखील हीच परिस्थिती आहे. यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगाची लागण होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबला तर शिल्लक माशांचाही मृत्यू होईल अशी शंका व्यक्त होत आहे.









