उन्हाळ्यात डॉग बाइटच्या घटना 11 टक्क्यांनी वाढता
उन्हाळ्यात श्वान अधिक संतप्त होत असतात. याचमुळे या कालावधीत डॉग बाइटच्या घटनांमध्ये वाढ होत असते असा खुलासा नव्या संशोधनातून झाला आहे. डॉक्टरानुंसार हिवाळा किंवा पावसाळ्याच्या तुलनेत डॉग बाइटच्या घटना उन्हाळ्यात 11 टक्क्यांनी वाढतात.
अशाचप्रकारे उष्णतेचा माणसांवरही प्रभाव पडत असतो. अमेरिकेच्या अॅरिझोना रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आलेल्या एका अध्ययनात अधिक तापमानामुळे लोक संतप्त होतात आणि परस्परांशी भांडू लागतात असे आढळून आले आहे. अमेरिकेतील दुसऱ्या संशोधनात तापमान वाढल्याने हिंसा 4 टक्के तर सामूहिक हिंसेत 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. तर स्पेनमध्ये रस्ते दुर्घटनांचा धोका 7.7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
श्वानांनी चावा घेण्याशी तापमानाचा संबंध
संशोधकांनी डॉग बाइट दर आणि दरदिनीच्या तापमानामधील संबंध जाणून घेण्यासाठी अध्ययन केले आहे. यात तापमान अधिक असताना डॉग बाइटच्या घटना वाढल्याचे यात आढळून आले. परंतु कुठल्या प्रजातीच्या श्वानांवर उष्णतेचा प्रभाव अधिक झाला याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. डॉग अग्रेशनबद्दलही काहीच सांगण्यात आलेले नाही.
69 हजारांहून अधिक डॉग अटॅकवर संशोधन
अमेरिकेतील 8 शहरे डलास, ह्युस्टन, बाल्टीमोर, बॅटन रुज, शिकागो, लुइसविले, लॉस एंजिलिस आणि न्यूयॉर्कमध्ये 2008-18 दरम्यान झालेल्या श्वानांच्या हल्ल्यांसंबंधी संशोधन करण्यात आले. या घटनांची संख्या सुमारे 69,525 इतकी होती. म्हणजेच दरदिनी श्वानांनी चावा घेण्याच्या 3 घटना घडल्या आहेत. संशोधनानुसार केवळ श्वानच नव्हे तर तापमान वाढताच माकड अन् उंदरांच्याही संतापात भर पडत असते.
तापमान अन् माणूस
उन्हाळ्यात मानवी शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढू लागतो, स्ट्रेस हार्मोनला कॉर्टिसोल देखील म्हटले जाते. हिवाळ्यात कार्टिसोलची पातळी कमी राहते, परंतु उष्णता वाडू लागताच कार्टिसोलची पातळीही शरीरात वाढू लागते. यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. उष्णतेचा प्रभाव मेंदूवर पडत असतो. मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन अन् हायड्रेशन न मिळाल्याने तो व्यक्त होतो आणि याच्या परिणामादाखल आपल्याला नैराश्य, तणाव किंवा संतापाची जाणीव होते.