खूनाचे गूढ उकलेना; पोलिसांनी 50 हून अधिक टिपणे नोंदवली
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील कोतवडे येथील दिलीप रामाणे या प्रोढाच्या खून प्रकरणात जंगजंग पछाडूनही पोलिसांना अद्याप आरोपीचा शोध लागू शकला नाह़ी खूनाच्या घटनेला आता 3 महिने पूर्ण झाले असले तरी पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाह़ी पोलिसांकडून आतापर्यंत गावातील 100 हून अधिकजणांची चौकशी करण्यात आली आह़े तर 50 पेक्षा जास्त लोकांची टिपणी पोलिसांनी नोंदवली आह़े एवढे करूनही रामाणे यांच्या मारेकऱ्यांचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाह़ी.
दिलीप रामचंद्र रामाणे (58, ऱा कोतवडे लावगणवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आह़े दिलीप यांचा रक्ताने माखलेल्या स्थितीतील मृतदेह 17 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास कोतवडे पुंभारवाडी परिसरात आढळला होत़ा दिलीप यांची पत्नी दर्शना हिने पोलिसांत दाखल केलेल्या तकारीनुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून अज्ञाताविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल़ा रामाणे यांचा खून नेमका कुणी व का केला, या बाबतची उत्तरे पोलिसांना मिळून आली नाहीत़.
पोलिसांकडून गावातील पत्येक घरामध्ये जावून मृत दिलीप यांचा कुणाशी काही वाद अथवा पैशाचा व्यवहार होत का, या बाबत चौकशी करण्यात आली. मागील 3 महिन्यात रत्नागिरी ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे कोतवडे परिसरात चौकशी करत आहेत़ मात्र कोणताही धागादोरा पोलिसांना अद्याप सापडलेला नाह़ी तत्कालीन वादातून दिलीप यांचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आह़े मात्र या बाबतही ठोस काही पोलिसांच्या हाती आलेले नाह़ी.
दिलीप याचा खून झाला, त्या दिवशी कुभारवाडी येथून पालखी वाड्या-वस्त्यांवर फिरत होत़ी 17 मार्च रोजी सायंकाळी दिलीपचा मृतदेह आढळला, त्या ठिकाणाहून पालखी मार्गस्थ झाली होत़ी यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या पालखीसोबत होत़े पालखी निघून जाताच काही वेळानंतर दिलीपचा खून करण्यात आल़ा मात्र पालखीसोबत असलेल्यांना या खूनाची खबर कशी लागली नाही, या बाबतही पश्नचिन्ह उपस्थित होत आह़े रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून दिलीप यांच्या खून पकरणात सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आह़े तसेच मोठ्या संख्येने टिपणे पोलिसांनी घेतली आहेत़ मात्र अद्याप कोणताही ठोस धागादोरा पोलिसांना मिळालेला नाह़ी दिलीपला दारू पिण्याचे व्यसन लक्षात घेता त्याच्यासोबत असणाऱया लोकांची पोलीस चौकशी करत आहेत़ मात्र यामधूनही पोलिसांच्या हाती काही लागले नसल्याचे सांगण्यात आले.
निनावी पत्राद्वारे माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
दिलीप रामाणे यांचा खून गावातीलच व्यक्तीने केला असण्याचा संशय पोलिसांना आह़े त्यामुळे या खूनाबाबत गावातील कुणाला माहिती असल्यास निनावी पत्राद्वारे पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आह़े मात्र अद्यापपर्यंत त्याला कोणताही पतिसाद मिळाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









