आगरवाडा विभागीय कार्यालयावर कार्यकर्त्यांची धडक; वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
हरमल / वार्ताहर
मांद्रे मतदारसंघात सततच्या विजेच्या लपंडावामुळे जनता त्रस्त असून विद्यार्थ्यांना तसेच गृहिणींना मनस्ताप सहन लागत आहे. आठवड्याला दोन-तीन वेळा ‘शट डाऊन’ प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना अंधारात राहावे लागते. यासाठी वीज खात्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी मांद्रे गट काँग्रेस समिती व कार्यकर्त्यांनी दिली.
आगरवाडा विभागीय वीज कार्यालयात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. मांद्रे, हरमल, पालये, केरी भागातील नागरिक स्त्राr पुऊषांनी वीज खात्याच्या कारभारावर टीका केली. ‘शट डाऊन’बाबत वीज खात्याने गावोगावी रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे आगाऊ सूचना देण्याची मागणी मांद्रे काँग्रेस गटाध्यक्ष नारायण रेडकर यांनी केली. रस्त्यावरील ख•dयांची स्थिती वीज खात्याने केल्याचे साबांखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र वीज खाते वीजपुरवठा सुरळीत करण्यात गुतंले असून, रस्त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याचे रेडकर यांनी नाराजीच्या सुरांत सांगितले.
वीज खाते आगाऊ कल्पना न देता, ‘शट डाऊन’ व वारंवार वीजपुरवठा खंडित करीत असल्याने लोकांचा संयम सुटत असून, वीज खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे जनतेला घेऊन काँग्रेस रस्त्यांवर उतरेल, असा इशारा गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनी दिला.
मांद्रेतील वीज समस्या सर्वसामान्य लोकांना भेडसावत आहे. विजेअभावी विजेवरील उपकरणे चालत नाहीत. लोकांनी स्वयंपाक करू नये, उपाशी राहावे असे वीज खात्याला वाटते काय, असा सवाल जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रणव परब यांनी केला. वीज मंत्र्यांने दिलेले आश्वासन हवेत विरले असून,कारभार सांभाळता येत नसल्यास,त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
विजेचा फायदा नाही, बिले पाठवू नका!
मांद्रे भागांतील जनतेस वीजपुरवठ्याचा काहीही फायदा होत नसल्याने खात्याने बिले पाठवणे बंद करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, शट डाऊनचा प्रकार सब स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरळीत होईल, असे कनिष्ठ अभियंता रायकर यांनी सांगितले.
दरम्यान, केरी परिसरातही वीजखंडीतची समस्या नेहमीच सतावते, अशी तक्रार कावेरी धुरी यांनी यावेळी मांडली. वीज समस्या कायमस्वरुपी मिटण्यासाठी मांद्रे मतदारसंघ बंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा हरमल येथील महिला कार्यकर्त्या कविता नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी मांद्रे मतदारसंघातील सुमारे 40 महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.









