वार्ताहर / अगसगे
एपीएमसीच्या कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजूगौडा पाटील तर उपाध्यक्षपदी आनंद कावळे यांची निवड करण्यात आली. एपीएमसी कार्यालयामध्ये कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड केली. यावेळी अध्यक्षपदी राजूगौडा पाटील, उपाध्यक्षपदी आनंद कावळे, सेक्रेटरीपदी रमेश हुक्केरी व खजिनदारपदी जोतिबा राजाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदस्यपदी जोतिबा कटांबळे, विकी सचदेव, संभाजी होनगेकर, विशांक पाटील, अशोक पवार, मनोज, मत्तीकोप, हुवाप्पा मुतगेकर, विवेक पाटील, एस. बी. पाटील, दीपक पाटील, राजू पाटील यांची निवड करण्यात आली.









