कोल्हापुर प्रतिनिधी
22 सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्यावतीने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सुविधा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक तसेच मागासवर्गीय घटकांकरिता त्यांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता योजना राबवल्या जातात. याची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना व्हावी व जे पात्र महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांनी स्वतः लाभ घ्यावा तसेच त्यांच्याकडून सदर माहितीची प्रचार प्रसिद्धी समाजातील इतर लोकांना व्हावी याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालय मध्ये बोलावून देत आहोत याचा लाभ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
आज महाराष्ट्र जुनिअर महाविद्यालय शिवाजी पेठ कोल्हापूर कडील महाविद्यालय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला सामाजिक न्याय विभाग ,इतर बहुजन कल्याण विभाग व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पीपीटी द्वारे सचिन कांबळे, तालुका समन्वयक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांनी उपस्थित यांना दिली. आजच्या या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी व समान संधी केंद्राचे प्रतिनिधी व शुभम भाट कनिष्ठ लिपिक सहायक आयुक्त समाजकल्याण उपस्थित होते.