कर्मचाऱ्यांचे हाल
सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वरात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून पावसाळा आला तरी वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याने अद्यापही वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच आहेत.
सध्या येथे जोरदार वारे वाहत असल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. वीजवाहक तारा अनेक ठिकाणी जंगलातून गेलेल्या आहेत. पाऊस, वाऱ्यामुळे अनेक वेळा झाडांच्या फांद्या तारांवर पडून वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात.
पाचगणी व महाबळेश्वरला वीज पुरवठा भुयारी मार्गाने होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे ग्राहकांना वारंवार खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागते.
महाबळेश्वर महावितरणचा अनागोंदी कारभार हा नेहमीच इथला चर्चेचा विषय ठरत आहे. महावितरणने याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करुन जगप्रसिध्द पर्यटनस्थळी वीज पुरवठा पुरेशा दाबाने सुरु ठेवावा. तरी मिळत नाही..
स्थानिक अधिकाऱ्यांना वीज पुरवठा खंडित झाल्यावर विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. वीज कर्मचाऱ्यांना खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इंशुलेटेड पकडी, बूट, रेन सूट, मोठी शिडी, ती नेण्यासाठी वाहन पावसाळा सुरू झाला तरी मिळत नाही.









