परमार्थ निकेतन ट्रस्टतर्फे महापौर शोभा सोमनाचे यांना निवेदन
बेळगाव : अनगोळच्या प्रवेशद्वारासमोर स्वागत कमानीची उभारणी करावी. यासाठी परमार्थ निकेतन ट्रस्टच्यावतीने महापौर शोभा सोमनाचे यांना निवेदन देण्यात आले. अनगोळमध्ये प.पू. कलावती देवी यांचे मंदिर आहे. श्रीहरिमंदिराला मोठ्या संख्येने भाविक परराज्यातून येत असतात. कमान उभे केल्यास त्यांना त्याचा फायदा होणार आहे. परराज्यातून भाविक येत असल्यामुळे बऱ्याचवेळा अनगोळला जाण्याऐवजी पुढच्या रस्त्याला जात असतात. त्यामुळे गैरसोय होते. हरिमंदिरमध्ये दिवसांतून तीनवेळा प्रार्थना होते. या प्रार्थनेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. तेव्हा त्यांना समजण्यासाठी या ठिकाणी प्रवेशद्वारावरच स्वागत कमान उभी करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.









