मालवण / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन, मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा तसेच डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा, या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. फर्स्ट इयर डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.30 जून पर्यन्त वाढविण्यात आली असून डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी अंतिम मुदत दि. 03 जुलै आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. विद्यार्थी व पालकांनी अगदी घरबसल्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी E-SCRUTINY या पर्यायाची निवड करावी अशी विनंती करण्यात येत आहे. Physical Scrutiny या पर्यायामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून ,प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह १.स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), २. संगणक (Computer) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -६०) , ३. विद्युत (Electrical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ४. अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ५. यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०) व ६. अन्न तंत्रज्ञान (Food Technology) (प्रवेश क्षमता -२०) या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज भरून निश्चित करणेसाठी सुविधा केंद्राचा (FC 3010) लाभ घेण्यात यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे.अधिक महितीसाठी प्रा.डी.एन.गोलतकर-9764513133, डॉ. वाय.व्ही.महाडीक-9423682846, यांच्याशी संपर्क साधावा.









