दिल्लीत 2000 ई बस धावणार : दिल्ली परिवहनचा इलेक्ट्रिक बससाठी पीएमआय इलेक्ट्रोसोबत करार
नवी दिल्ली :
सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. ईव्ही उत्पादक आणि खरेदीदारांसाठी सरकार अनुदान योजना राबवत आहे. परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवण्यावर दिल्ली सरकारचे लक्ष असून त्यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत दिल्ली सरकारने 2000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे.
लवकरच, दिल्लीत धावणाऱ्या एकूण बसेसपैकी 80 टक्के बस इलेक्ट्रिक बस असतील. एका अधिकृत निवेदनानुसार, दिल्ली सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या ताफ्यात 2,026 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे, त्यापैकी 100 इलेक्ट्रिक बसेसची पहिली खेप या वर्षी सप्टेंबरपर्यंत वितरित होण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने इलेक्ट्रिक बस उत्पादक पीएमआय इलेक्ट्रोसोबत करार केला आहे. देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक बस उत्पादकांपैकी एक असलेल्या पीएमआय इलेक्ट्रोने दिल्ली परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाला 728 नऊ-मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय 12 मीटर लांबीच्या 570 इलेक्ट्रिक बसेस परिवहन विभागाला देण्यात येणार आहेत.
पीएमआय इलेक्ट्रोचे अध्यक्ष सतीश जैन म्हणाले की, शून्य डाउनटाइम सुनिश्चित करण्यासाठी कंपनी इलेक्ट्रिक बसेसच्या नियमित देखभालीसाठी दिल्ली सरकारला मदत करेल. निवेदनात असे म्हटले आहे की अण् च्या आदेशानुसार प्रदान केलेल्या झ्श्घ् च्या 100 बस सध्या दिल्लीत धावत आहेत. या इलेक्ट्रिक बसेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून उत्कृष्ट कार्यप्रदर्शन, प्रवाशांची सुरक्षा आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करतात.
ठळक नोंदी
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रिक बसेसमध्ये रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या सुरक्षा यंत्रणा असतात.
क्र् या बसेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी स्वयंचलित व्हीलचेअर रॅम्पदेखील आहेत.
2026 संख्येच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे पुढील 12 वर्षांत दिल्लीत 14.50 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल.
2025 पर्यंत दिल्लीच्या रस्त्यावर 10,000 हून अधिक बस धावतील, त्यापैकी 80 टक्के इलेक्ट्रिक बस असतील.









