सुकेकुळण धारगळ अपघात प्रकरणी अशोका बिल्डकॉन कंपनीला जबाबदार धरा : राजन कोरगावकर यांची मागणी
पेडणे : सुकेकुळण धारगळ येथे 16 जून रोजी झालेल्या अपघातात नामदेव कांबळी यांचा मृत्यू झाला तर काशिनाथ शेट्यो हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेस सर्वस्वी जबाबदार रस्ताकामाचा कंत्राटदार अशोका बिल्डकॉन कंपनी ही आहे. या प्रकरणी तपासकामात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले. पोलीस कुणाच्यातरी दबावाखाली करत असल्याचा आरोप मिशन फॉर लोकलचे प्रमुख राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर कारवाई करून पेडणे पोलिसांनी स्थानिकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
अपघातानंतर जो उद्रेक झाला त्याला सर्वस्वी जबाबदार सरकारी यंत्रणा आणि पोलीस खाते जबाबदार आहे. आमदाराकडे हुकूमशाहीची भाषा असल्याचे दिसत असून आपुलकीची भाषा आमदाराकडे असणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर आघात झाला, ते दु:खात आहे. त्या पोलीस स्थानकावर नेऊन चौकशी करणे योग्य नाही. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या अपघात घडल्याचे समोर आला आहे. सरकारी यंत्रणेने तसेच पोलिसांनी लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली न येता कर्तव्य बजवावे. मात्र पेडणे पोलीस कुणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्टपणे अपघाताच्याक्षणी जाणवले. तेथे उत्स्फूर्तपणे जमलेल्या 15 स्थानिक नागरिकांवर गुन्हा नोंदविला. तसेच अन्य अज्ञात दोनशे जणांवरही गुन्हा नोंद केला. यातील बरेचशेजण अपघातात बळी गेलेल्या शेमेचे आडवण येथील नामदेव कांबळी यांचे शेजारी व जवळचे नातेवाईक पाहण्यासाठी आले होते. त्यांच्यावर सरसकट गुन्हा नोंद करणे कितपत योग्य? असा सवाल कोरगावकर यांनी केला आहे. अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकांची सर्वती चौकशी त्याच्याकडील कागदपत्रांची तापसणी करण गरजचे होते. मात्र स्थानिक आमदार पेडणेतील लेंकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राजन कोरगावकर यांनी यावेळी केला. मात्र पेडणे पोलिसांनी नि:पक्षपणे काम करावे आणि कायद्याची बाजू समजून घेऊन लोकांना न्याय द्यावा अशी मागणीही यांनी केली.
पोलीस यंत्रणा कुचकामी !
अपघात होऊन पाच दिवस झाले, मात्र पोलीस यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे. अपघतातील संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून याला अजूनही तो पोलिसांना सापडला नाही.









