बेळगाव : स्टायलिश व तंत्रज्ञानाने युक्त उत्पादने सादर करण्याच्या आपल्या उत्पादन नूतनीकरण धोरणाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटारसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने मंगळवारी नवीन पॅशन प्लस दुचाकी लाँच केली. ग्राहकांच्या सतत वाढत असलेल्या मागण्यांची पूर्तता करत पॅशन प्लस स्टाईल, आरामदायीपणा व सोयी-सुविधेची परिपूर्ण सोबती आहे. ज्यामुळे ही मोटारसायकल दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्त आहे. प्रतिष्ठित ब्रॅण्ड पॅशनच्या प्रबळ वारसाला अधिक दृढ करत नवीन मोटारसायकलच्या उत्साही डिझाईनला नवीन रुप देण्यात आले आहे. तसेच राईडर्ससाठी युटिलिटी व कम्फर्ट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली आहे. हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर (सीजीओ) रणजीवजीत सिंग म्हणाले, ‘मोटारसायकल श्रेणीमध्ये स्टाईल, विश्वसनीयता व आरामदायीपणाच्या घटकांना परिभाषित केलेला प्रतिष्ठित ब्रॅण्ड पॅशनमध्ये गेल्या दशकभरात परिवर्तन झाला आहे. ब्रॅण्डवरील ग्राहकांचा विश्वास आणि पॅशनप्रती त्यांची अविरत आवड यामुळे आम्हाला या मोटारसायकलला नवीन अवतारामध्ये सादर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. स्टायलिश लुक्स आणि राईडर्सच्या सोयी-सुविधेसाठी उत्साहवर्धक वैशिष्ट्यांसह आम्हाला विश्वास आहे की, नवीन पॅशन प्लस ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल आणि विभागातील आमची उपस्थिती अधिक दृढ करेल.’
नवीन शक्तिशाली लूक
नवीन हिरो पॅशन प्लसमध्ये जुन्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तसेच ही मोटारसायकल समकालीन आहे. सर्वात मोठ्या व व्यापक प्रतिष्ठेसह पुनरागमन केलेल्या पॅशन प्लसमध्ये नवीन शक्तिशाली लूक आहे, जो स्टायलिश ग्राफिक्ससह सुधारण्यात आला आहे. हँडलवरील आकर्षक क्रोम फिनिश, मफलर कव्हर व युटिलिटी केस आणि सिग्नेचर ड्युअल टोन प्रतिष्ठित मोटारसायकलच्या समकालीन स्टायलिंग महत्त्वाकांक्षांना साजेसे आहेत.









