वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
लंडनमध्ये सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या खुल्या बर्मिंगहॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या वयस्कर आणि अनुभवी 43 वर्षीय व्हीनस विल्यम्सने इटलीच्या कॅमिला जॉर्जीला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात व्हीनस विल्यम्सने जॉर्जिचा 7-6(7-5), 4-6, 7-6(8-6) असा पराभव केला. हा सामना तीन तास चालला होता. 2019 नंतर व्हीनसने पहिल्यांदाच महिला टेनिसपटूच्या क्रमवारीतील पहिल्या 50 टेनिसपटूतील खेळाडूचा तीन सेट्समध्ये पराभव केला आहे. स्नायू दुखापतीमुळे व्हीनस जवळपास सहा महिने टेनिस क्षेत्रापसून अलिप्त होती.









