मॅनेजरने 80 लाख रुपयांचा घातला गंडा
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच रणवीर कपूरसोबत अॅनिमल या चित्रपटात दिसून येणार आहे. याचदरम्यान रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. रश्मिकाला तिच्याच मॅनेजरने गंडा घातला आहे. फसवणुकीचा प्रकार उघड होताच रश्मिकाने मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकले आहे.

मॅनेजरने 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे कळताच रश्मिका नाराज झाली होती. मॅनेजर दीर्घकाळापासून रश्मिकासोबत काम करत होती. अभिनेत्रीला अंधारात ठेवून ती रक्कम लंपास करत होती. रश्मिका या प्रकरणाचा गाजावाजा इच्छित नसल्याने तिने यावर कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
रश्मिका सध्या रणवीर कपूरसोबत स्वत:चा आगामी चित्रपट अॅनिमलच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. अलिकडेच निर्मात्यांनी याचा प्री-टीझर प्रदर्शित केला असून चाहत्यांची याला मोठी पसंती मिळाली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी ‘गदर 2’ आणि ‘ओएमजी 2’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत.









